शेंदुर्णीत रोग प्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या औषधाचे वाटप

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी । येथील येथील होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आयुष मंत्रालय दिल्ली यांनी जाहीर केलेल्या प्रतिकार शक्ती वर्धक होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले.

येथील येथील होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आयुष मंत्रालय दिल्ली यांनी जाहीर केलेल्या प्रतिकार शक्ती वर्धक होमिओपॅथिक औषधांचे वाटप करण्यात आले. या वेळी होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने कोरोना आपत्तीच्या काळात आवश्यक सुविधा पुरवणार्‍या सर्व व्यक्तींना शासनाच्या दिशानिर्देशानुसार शक्तिवर्धक होमिओपॅथिक औषधींचे वाटप करण्यात आले या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे
येथील होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. देवानंद कुलकर्णी उपाध्यक्ष डॉ.भूषण गरुड सचिव डॉ श्रीकांत पाटील डॉ.नीलम अग्रवाल, डॉ. अतुल पाटील, डॉ.चेतन अग्रवाल,डॉ. राहुल सूर्यवंशी,डॉ युवराज बारी,डॉ.विजय राठोड,डॉ. अलकेश नवाल आणि इतर सर्व असोसिएशन पदाधिकारी यांच्या वतीने येथील अत्यावश्यक सुविधांमध्ये कार्यरत असलेले पत्रकार, पोलीस, बँक कर्मचारी, भाजीविक्रेते दुकानदार, नगरपंचायत कर्मचारी सर्व सहकारी संस्थांमधील कर्मचारी यांना होमिओपॅथी औषधांचे वाटप करण्यात आले. यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content