भुषण कॉलनीतील साई अपार्टमेंटमधून दुचाकी आणि रिक्षाची बॅटरी चोरट्यांनी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भुषण कॉलनीत राहणाऱ्या एका अपार्टमेंट मधून एकाची दुचाकी तर दुसऱ्याच्या रिक्षाची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात ज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुषण कॉलनीतील साई अपार्टमेंटमध्ये रिक्षाचालक महेंद्र नामदेव पाटील हे भाड्याच्या घरात राहातात. त्यांच्याकडे (एमएच १९ व्ही ७२४४) क्रमांकाची रिक्षा आहे.  तर त्यांच्याच घराच्या बाजूला अनुभूती शाळेत कामाला असलेले एक व्यक्ती राहतात. त्यांच्याकडे (एमएच १९ बीवाय ३६४८) क्रमांकाची दुचाकी आहे. ७ जानेवारी रोजी रात्री कामावरून आल्यानंतर रिक्षाचालक आणि दुचाकीधारकांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये वाहने लावली होती. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री अपार्टमेंटमध्ये लावलेली दुचाकी आणि रिक्षाची बॅटरी असा एकुण ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी महेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content