मंदिरात चोरी करणारा अमळनेर पोलिसांच्या ताब्यात

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी नाशिकच्या पंचवटीतील सप्तशृंगी मंदिरात चोरी करणार्‍या भामट्याला अमळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

नाशिकच्या पंचवटीतील सप्तश्रुंगी मदिरात २६ मे २०२३ रोजी चोरी झाली होती. यात चोरट्याने मंदिरातील पादुका चोरी करून आपले गैरकृत्य बाहेर येवु नये व पोलीस आपल्याला पकडु नये या उद्देशानेच अमळनेर या ठिकाणी येऊन मजुरी सुरू केली होती.

 

दरम्यान, पंचवटी पोलीस स्टेशनला भाग ५ गु रन २७/५/२०२३रोजी  २६९/२०२३ भा द वि ३८० प्रमाणे दाखल झाल्यानंतर त्याचा तपास सुरू केला.अमळनेर पोलीसांनी मागील काही महीन्या पासुन शहरातील गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवुन असल्याने  अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर व पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना जोपनीय माहिती मिळाली. त्यांना खबर मिळाली की अमळनेर शहरातील विश्वकर्मा मंदिरा शेजारी मजुरी कामासाठी नाशिक येथील किशोर चव्हाण नामक अट्टल चोरटा हा नाशिक शहरात पंचवटी परिसरातील सप्तशृंगी मंदिरात चोरी करून अमळनेर शहरात लपून बसला असून तो रोज विदेशी दारु पिऊन मौजमस्ती करत आहे .

 

दरम्यान, ही माहिती मिळाल्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी भटुसिंग तोमर,मिलिंद भामरे,सुनील हटकर,कपिल पाटील, जितेंद्र निकुंभे यांना सदर इसमाचा शोध घेऊन ताब्यात घेण्यास सांगीतल्यावर सदर पोलीस पथकाने दि ३१ रोजी राञी १ वाजेच्या सुमारास खाञी झाल्यावर त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणले व विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने आपण  नाशिक येथील सप्तशृंगी मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.

नाशिक पंचवटी पोलिसांना मंदिरात चोरीच्या घटनेतील चोरटा अमळनेर पोलिसाच्या ताब्यातून घेऊन जाण्या बाबत नाशिक पोलीसांशी संपर्क साधून त्यास ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content