धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा मृत्यू

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने अज्ञात इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रंमाक ३७८ / २१ / २३ नजीक डाऊन ट्रकवर कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने अज्ञात इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचा पंचनामा केला.

अज्ञात इसमाचा मृतदेह पाचोरा येथील रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक तुषार विसपुते हे करीत आहे.

Protected Content