मोहाडी येथे गावठी दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ आसलेल्या मोहाडी गावात बेकायदेशीर पध्दतीने गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एकावर पोलीसांनी कारवाई केली. यात १ हजार २०० रूपयांची गावठी दारू हस्तगत केली असून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात संशयित आरोपी सिताराम वामन सपकाळे (वय-५६) रा. नवीन कॉलनी, मोहाडी ता.जि.जळगाव हा बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोहेकॉ. जितेंद्र राठोड, पो.ना. समाधान पाटील, पोलीस ठाण्याचे पोहेकॉ सुध्दोधन ढवळे या पथकाने छापा टाकून संशयित आरोपी सिताराम सपकाळे यांच्या ताब्यातील १ हजार २०० रूपये किंमतीचा २० लिटर गावठी दारूची कॅन हस्तगत केली. याप्रकरणी पोहेकॉ सुध्दोधन ढवळे यांच्या फिर्यादीवरून सायंकाळ ७.३० वाजता एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content