अमळनेरात सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी काढली धिंड

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्यावर नागरीकांना आडवून बेदम मारहाण करून बळजबरीने लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह एकाला अमळनेर पोलीसांनी अटक केली. दोघांना न्यायालयाच्या आदेशान्वये बेड्या ठोकून गावातील भररस्त्यातून धिंड काढली आहे. यामुळे गुन्हेगारांचे ढाबे दणाणले आहे.

 

सराईत गुन्हेगार शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख (वय-२३) रा. संविधान चौक, अमळनेर आणि राहूल किशोर वानखेड रा. लोण चरम ता. अमळनेर असे अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील सराईत गुन्हेगार शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद हा अमळनेर, चाळीसगाव शहरात साथीदारांच्या मदतीने व्यक्तींना हेरून बेदम मारहाण करून दरोडा टाकणे, रस्तालुट करणे याबाबत आतापर्यंत वेगवेगळ्याप्रकारचे २३ गंभीर गुन्हे दाखल आहे. दरम्यान २ फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी शुभम देशमुख हा अमळनेर शहरात पत्नी व सासुकडे आल्याच गोपनिय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, पोहेकॉ सुनिल हटकर, पोलीस नाईक दिपक माळी, मिलींद भामरे, सुर्यकांत साळुंखे, रविंद पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, गणेश पाटील, रोहिदास आगोणे, सागर साळुंखे यांनी शहरातील गलवाडे रोड  प्रताप मिल येथे सापळा टाकून पकडण्यासाठी गेले असता संशयित आरोपी शुभम देशमुख हा पोलीसांना पाहून भिंतीवरून उडी घेवून पळण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याचा पायाला दुखापत झाल्याने पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे त्याचा साथिदार राहूल किशोर वानखेडे याला देखील त्याच्या राहत्या घरातून दुसऱ्या पथकाने अटक केली. यापुर्वी देखील सराईन गुन्हेगार शुभम हा पोलीसांच्या तावडीतून सुटू पसार झाला होता. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार बेड्या ठोकल्या.

 

भररस्त्यातून गुन्हेगारांची काढली धिंड

शुभम उफ शिवम उर्फ दाऊ मनोज देशमुख हा स्वत:ला दाऊद समजतो. अमळनेर शहरातील व्यापाऱ्यांकडून व नागरीकांकडून बळजबरीने पैसे घेवून जनतेच्या मनात दहशतीचे वातावरण पसरवत असल्याने सामान्य नागरीक व व्यापारी यांच्या मनातील भीती दुरू करण्यासाठी अमळनेर चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक दरम्यान दोघांना बेड्या ठोकत पायी धिंड काढली.

Protected Content