पोलीसांनी पकडलेला साडेतीन कोटींचा गुटखा न्यायालयाच्या आदेशाने केला नष्ट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ ते साकेगाव रस्त्यावर तीन कंटेनरमधून सुमारे सोडतीन कोटी रूपयांचा गुटखा शुक्रवार १ एप्रिल २०२२ रोजी पकडण्यात आला होता. तेव्हापासून जप्त गुटखा भुसावळ पोलीसांच्या ताब्यात होता. भुसावळ सत्र न्यायालयाने पकडलेला गुटखा नष्ट व जाळण्याचे आदेश दिल्यानंतर गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता डपिंग ग्राऊंडवर पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाळून नष्ट करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, राजस्थानातून जळगावकडे जाणारा तीन कंटेनर गुटख्याचा साठा तत्कालीन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळ-साकेगाव रस्त्यावर शुक्रवार १ एप्रिल २०२२ रोजी कारवाई करत जप्त  करण्यात आली होती. यावेळी पथकाने तीन कंटेनरमधून २ कोटी २७ लाख रुपयांचा गुटखा तसेच १ कोटी २३ लाख रुपये किंमतीचे तीन कंटेनर असा एकूण साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. पोलिसांच्या तपासात या गुटख्याचे राजस्थान कनेक्शन समोर आले होते तर याप्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, जप्त गुटखा पोलिसांच्या ताब्यात असल्याने भुसावळ सत्र न्यायालयाने त्यास नष्ट करण्यासाठी जाळण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता  डंपिंग ग्राऊंडवर पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक बबन जगताप, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शरद पवार, सरकारी पंच आदींच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला आहे.

Protected Content