क्रिकेटच्या वादातून झाला उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार ! (Video)

जळगाव जितेंद्र कोतवाल | उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज दुपारी क्रिकेट खेळण्याच्या वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यामुळेच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे उघड झाले असून यातील हल्लेखोरांची नावे देखील त्यांनी पोलीसांना सांगितली आहेत.

याबाबत वृत्त असे की, आज रात्री उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर गोळीबार केला. यात ते सुदैवाने बचावले. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना कुलभूषण पाटील म्हणाले की, आज दुपारी मी क्रिकेटच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या धुम्मसबाबत मध्यस्थी केली होती. हा वाद पोलीस स्थानकात गेला असतांना त्यांनी मिटविला. यामुळे संतापलेल्या एका गटातील काही जणांनी त्यांना पोलीस स्थानकातच शिवीगाळ केली. नंतर त्यांना फोनवरून धमकावण्यात आली. आज आम्ही तुला ठार मारून टाकू अशी धमकी त्यांना देण्यात आली.

दरम्यान, रात्री नऊच्या सुमारास कुलभूषण पाटील हे घराकडे येत असतांना त्यांच्य दिशेने गोळीबार करण्यात आले. यानंतर ते पळत घरात आल्यानंतर त्यांच्या घराच्या दिशेने देखील गोळीबार करण्यात आला. तथापि, गोळीबाराचा आवाज ऐकल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. यामुळे हल्लेखोर पळून गेले.

खालील व्हिडीओत पहा कुलभूषण पाटील यांच्यावरील गोळीबाराबाबतची माहिती.

Protected Content