भुसावळात दोघा विद्यार्थिनींना चाकूचा धाक दाखवून पळविण्याचा प्रयत्न

crime 2

crime 2

भुसावळ प्रतिनिधी । शहरात दोन अल्पवयीन विद्यार्थींनींचा शाळेच्या परिसरात चाकूचा धाक दाखवत पळवून नेत विनयभंग केल्याचा प्रकार सकाळी 7 ते 12 वाजेच्या दरम्यान झाला. याचा जाब विचारणाऱ्‍या मुलीच्या आईवर चाकू हल्ला केला. याप्रकरणी दोघांवर भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. अर्जुन विजय सपकाळे रा. चांदमारी चाळ, मनिष रविंद्र ठाकूर रा. गंगाराम प्लॉट असे दोन्ही आरोपींचे नाव आहे. यातील मनीषला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, आरोपी अर्जुन व मनिष याने दुचाकीवरून रेल्वे स्कुलमधील इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलीचा व तीच्या मैत्रीणीचा पाठलाग करून त्यांना चाकूचा धाक दाखवत धमकावले. आमच्यासोबत जिथे नेतो तिथे चला म्हणून सोबत घेऊन गेले आणि आरडाओरड केल्यास मारून टाकू अशी धमकी दिली. त्यांना सोबत नेले व काही वेळाने पुन्हा शाळेजवळ आणून सोडले. दरम्यान मुलीच्या आईने व वडिलांनी या मुलांना हटकले असता मुलीच्या आईच्या डाव्या हातास आरोपी मनीष याने चाकू मारून दुखापत केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बाल लैगिंक अत्याचार, प्रोक्सो नुसार दोघांवरगुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फ़ौजदार संजय कंखरे करीत आहे. दरम्यान पीडित मुली व तिच्या आई वडिलांची उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी भेट घेऊन घटनेची माहिती घेतली व आरोपींवर त्वरित योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

Protected Content