जिल्हाधिकाऱ्याचं बनावट फेसबुक अकाऊंट करणाऱ्या शाहरूखला पकडलं

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून पत्रकाराकडून ७० हजार रूपये घेणाऱ्या संशयिताला पुणे सायबर पोलीसांनी बेड्या ठोक्याला आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुकवर त्यांचे फोटो लावून फर्निचर विक्री करण्याचे बहाणा करून एकाकडून पैसे उकाळल्याचे समोर आले आहे.  शहारुख खान असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

 

राजस्थान मधल्या अलवर नगर जिल्ह्यातील बहादुरपूर गावातून शहारुख खानला सायबर पोलिसानी ताब्यात घेतलं आहे. आरोपीने राज्यातील अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांचे  बनावट प्रोफाइल फेसबुकवर बनवून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

 

काही दिवसांपूर्वी पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचेही फेसबूकवर बनावट अकाऊंट तयार करण्यात आले होते. त्यांचे बनावट फेसबुक अकाऊंटवरुन मेसेज करुन फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ‘कोणीतरी माझे फेक फेसबुक अकाऊंट उघडून माझ्या लिस्टमधील अनेकांना रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मेसेंजरवर संवाद साधत आहे. फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे. “माझे अन्य कोणतेही फेसबुक खाते नाही. कोणीही संतोषकुमार नावाचा CRPF मधील अधिकारी माझ्या परिचयाचा देखील नाही. या फेक अकाऊंटबाबत मी फेसबुकवर रिपोर्ट केला आहे. तसेच सायबर क्राईमच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. माझ्या मित्रांना विनंती आहे की त्यांनी या प्रकाराला फसू नये आणि कोणताही आर्थिक व्यवहार करु नये,” असं आवाहन त्यांनी केलं होतं.

Protected Content