Home Cities अमळनेर पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून दिला दम

पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून दिला दम

0
46

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती आशी, अमळनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. शहरातील एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण करत आहे. दरम्यान, गेल्या दोनवर्षांपासून अतुल सुधाकर पाटील हा तिचा पाठलाग करत आहे. शिवाय त्याने तिचा हात पकडून तिला गाडीवर बसून नेले. तसेच माझ्याशी बोलत जा नाहीतर मी तुझा असाच पाठलाग करेल असा दम दिला व विनयभंग केला. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. दरम्यान, पिडीत मुलीसह नातेवाईकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अतुल सुधाकर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहे.


Protected Content

Play sound