भुसावळ ; गुन्हेगारी नियंत्रणासाठी शिर्डी  पॅटर्न

 

भुसावळ ; प्रतिनिधी । 1 पेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्यांचे फोटो व गुन्हे यादी, तिसरा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांसह नामचीन गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आणि भुसावळातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी शिर्डी पॅटन वापरण्याची माहिती डी.वाय.एस.पी. सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी पदभार सांभाळला . तालुक्यातील समस्था जाणून घेण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते शहरातील समस्था पत्रकाराकडून जाणून घेतल्या.

भुसावळ शहरातील सर्वात मोठी अडचण वाहतुकीची आहे.रस्त्याच्या आजूबाजूला अतिक्रमणधारक रहदारीस अडथळा निर्माण करीत असल्याने अपघात वाढण्याची शक्यता आहे. मुख्य रस्त्यांवरील सर्व अतिक्रमण काढण्यात सुरुवात केली जाणार आहे.बाकी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन सूचना देण्यात येणार आहे.रस्त्यांवर जमाव करून व रात्रीच्या वेळेस कट्ट्यावर बसलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात येणार आहे , असेही ते म्हणाले .

गुन्हेगारांचा डाटा तयार करण्याचे काम सुरू केले आहे २१० नवदुर्गा मंडळांना अधिकृत परवानगी आहे.आरतीला पाच जणांच्यावर कार्यकर्ते नको. गरबा, दांडिया, विसर्जन करतांना कोठलेही वादय वाजविले जाणार नाही.या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई व या मंडळांची पुढील परवानगी रद्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कलम 144 लागू आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या आदेशाने पोलीस दत्तक योजना सुरू करण्यात आली असून रेकॉर्ड वरील गुन्हेगार,हिस्ट्रीसीटर यांच्यावर बारकाइने लक्ष ठेवण्यात येणार आहे. संघटित गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यासाठी मोका कारवाईत वाढ करण्यासाठी कोर्टातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. बाल गुन्हेगारांच्या कुटूंबियाची भेट घेऊन बाल गुन्हेगारी कशी आटोक्यात आणता येईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे , असेही ते म्हणाले यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत व गोपनीय विभागाचे पोना.नंदकिशोर सोनवणे उपस्थित होते.

Protected Content