बोरखेडा येथील हत्याकांडातील दोषींना फाशी द्या

 

रावेर, प्रतिनिधी । बोरखेडा येथील चार बालकांचे हत्याकांड व त्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यानुसार व आदिवासी विरोधात केलेल्या गैरकृत्याकरिता न्यायालये जलद गतीने खटला चालवून आरोपींना फासी देण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत सरकार मार्फत देण्यात यावा अशी मागणी रावेर वंचित आघाडीतर्फे नायब तहसीलदार एम.जे.खारे व पोलीस निरीक्षकरामदास वाकोडे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, रावेर येथील बोरखेडा रस्त्यालगत आदिवासी कुटुंबातील चार अल्पवयीन बालकांचे हत्याकांड व त्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार विरोधी कायद्यानुसार व सदर कुटुंब हे आदिवासी असल्याने आदिवासी हे या देशाचे मूळ निवासी असल्याने आदिवासी विरोधार्त केलेल्या गैरकृत्या करिता भारतीय संविधानातील अनुसूची ५ व ६ नुसार न्यायालये जलद गतीने खटला चालवून आरोपींना फासी देण्यात यावी. आदिवासी मजूर कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत सरकार मार्फत देण्यात येवून न्याय मिळवून देण्यात यावा. यासह इतर मागण्या पुढील प्रमाणे    ५० लाख रुपये मदत मिळाली पाहिजे. मुलाला शासकीय  नोकरीत समाविष्ठ केले पाहिजे. घरकुल योजनेचा लाभ तत्काळ मिळावा. १० एकर शेती मशागती करण्यासाठी कायमस्वरूपी त्यांच्या वडिलांच्या  नावे करण्यात यावी. निवेदनावर वंचित बहिजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रफ़िक़ बेग, वंचित बहिजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, कांतीलाल गाढे, सलीम शाह, बाळा शिरतुरे, रहेमान पिंजारी, रमेश सोनवणे, देवराम कोचुरे , सुरेश अटकाळे, दौलत अढांगळे, गौतम अटकाळे, किरण वाघ यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सह्या आहे.

Protected Content