जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथील सेंटींग काम करणाऱ्या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना रायपूर – कुसुंबा दरम्यान सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, ईश्वर अर्जून पाटील (वय-३२) रा. चिंचोली ता.जि.जळगाव हे तरूण आपल्या कुटुंबियांसह राहतात. गेल्या १० ते १५ वर्षांपासून सेंटींगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या महिन्याभरापासून जळगाव शहरातील एका भागात बांधकाम करण्याचे काम सुरू आहे. आज सकाळी १० वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएस ५२१६) ने कामाला गेले. सायंकाळी काम आटोपून घरी परतत असतांना तालुक्यातील रायपूर आणि कुसुंबा दरम्यान मागून अज्ञात वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघात ईश्वर पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार बसल्याने जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याची वार्ता गावात पसरल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. मयत ईश्वरच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि आई मथूराबाई आणि वडील अर्जून पाटील असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.