लंडनहून भारतात आलेले 5 प्रवासी करोना पॉझिटिव्ह

 

नवी दिल्ली । महाराष्ट्रात करोनाचा नाईट कर्फ्यू लागलेला असतानाच लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात पाच प्रवासी करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात पाच प्रवासी करोना पॉझिटीव्ह आढळले असून या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या विमानात एकूण २६६ प्रवासी होते. विशेष म्हणजे ब्रिटनमध्येच करोनाचा घातक विषाणू सापडला आहे. या पार्श्वभूमीवर ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे.

दरम्यान, करोनाच्या नव्या व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर भारतासह सुमारे 13 देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. आठवडाभरासाठी ही बंदी असणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Protected Content