महिलेचे बंद घर फोडून ६२ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील तापी पुलाजवळील साईचंद्र नगरात राहणाऱ्या महिलेचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ६२ हजार ८०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवार १६ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, योजना संजय पाटील (वय ३८ रा. साईचंद्र नगर, जळगाव) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता योजना पाटील यांनी घर बंद करून बाहेरगावी गेल्या होत्या. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के आणि ३ हजारांची रोकड असा एकुण ६२ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. योजना पाटील या मंगळवारी १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घरी आल्या तेव्हा घरात चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद हे करीत आहे.

Protected Content