केडगाव येथे दुचाकीला अपघात ; महिला जागीच ठार

अहमदनगर (वृत्तसंस्था) केडगाव येथील नगर – पुणे मार्गावरील हॉटेल अंबिका समोर झालेल्या अपघातात स्कुटरवरील एक महिला जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाली.

 

मनिषा बाळासाहेब कापरे ( वय ३८ ) या मयत झाल्या आहेत. रेखा प्रशांत चव्हाण ( वय ३३ ) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या दोघीही सख्या बहिणी आहेत. त्या स्कुटरवरून केडगावहून भूषणनगरकडे जात असताना त्यांच्या वाहनाला एका अवजड वाहनाची धडक बसली. त्यात मनिषा कापरे या जागीच ठार झाल्यात. या अपघातामुळे बराच वेळ दुतर्फा वाहतूक विस्कळीत झाली होती.

Protected Content