जळगावात घरफोडीतील गुन्हेगारास पोलीस कोठडी

Crime newss

जळगाव प्रतिनिधी । आजाराच्या उपचारासाठी गावी गेलेल्या महिलेचे बंद घर फोडून 40 हजाराचा मुद्देमार लंपास करणाऱ्या चोरट्यास आज एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. फिरोज शेख इकबाल शेख वय-22 वर्ष रा. बिस्मील्ला चौक, तांबापूरा असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, जमीलाबी शेख इस्माईल (वय-54) रा. पुजा बेंटेक्स दुकानाच्या समोर, बिसमिल्ला चौक, तांबापूरा हे घरात एकट्याच राहतात. त्या आजारी राहत असल्याने त्यांचे उपचार शिर्डी येथे सुरू असतात. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता घराला कुलूप लावून शिर्डी येथे उपचारासाठी गेल्या होते. 24 नोव्हेंबर रोजी दुपारी घराच्या बाजूला राहणारे रहिवाशी यांनी फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी वेगळा राहणार मुलगा फारूख याला घरी जावून तपासणी करण्यास सांगितले. आज सकाळी त्या घरी आल्यानंतन त्यांनी तपासणी केली असता घरात ठेवलेले 25 हजार 400 रूपये रोख, 3 हजार रूपये किंमतीची 2 ग्रॅम सोन्याची अंगठी, 9 हजार रूपये किंमतीची 6 ग्रॅम सोन्याची पोत आणि 3 हजार रूपये किंमतीचे पितळ्याची भांडे असे एकुण 40 हजार 400 रूपयांचा मुद्देमालाची चोरी झाल्याचे उघडकीस आले.

अटक केलेला संशयित आरोपी फिरोज शेख इकबाल शेख याला 26 रोजी रात्री 9 वाजता एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले. विरोधात यापुर्वी त्याच्यावर हाणामारी आणि चोरीच्या प्रकरणी नशीराबाद आणि एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याकामी पोहेकॉ विजय नेरकर, पोहेकॉ जितेंद्र राजपूर यांनी कारवाई केली.

Protected Content