‘तो’ धक्का भाजपला न पेलवणारा असेल : नितीन लढ्ढा

जळगाव प्रतिनिधी । भाजपने गेल्या अडीच वर्षात ढिसाळ नियोजनामुळे शहराचा बट्टयाबोळ केल्याचा आरोप करतांना शिवसेनेकडे उद्या दिसणारे संख्याबळ हे भाजपसाठी न पेलवणारा धक्का असेल असा सूचक इशारा माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिला आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते.

उद्या होणार्‍या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आज शिवसेनेतर्फे अनुक्रमे Livetrends News जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी दोन्ही उमेदवारांसह शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी महापौर ललीत कोल्हे, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर राखी सोनवणे, अनंत जोशी, नितीन बरडे, अमर जैन, विराज कावडिया आदींची उपस्थिती होती.

दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका निभावणारे माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, जळगावातील नागरिकांनी भाजपला भक्कम बहुमत दिले होते. मात्र त्यांना कामांचे योग्य नियोजन करता आले नाही. शहरासाठी आलेल्या १०० कोटींचा विनियोग देखील करता आला नाही. Livetrends News

लढ्ढा पुढे म्हणाले की, आमच्याकडे असणारे नगरसेवक हे अनुभवी आणि कामांची जाण असणारे आहेत. Livetrends News यामुळे आगामी अडीच वर्षात शहरात विकासकामे करण्यात येतील. शिवसेनेकडे भक्कम बहुमत असून उद्या प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस दिसणारे बहुमत हे भाजपला न पेलवणारा धक्का असेल असा सूचक इशारा देखील नितीन लढ्ढा यांनी याप्रसंगी दिला.

Protected Content