राजमालती नगरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजमालती नगरात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली.  याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील दुध फेडरेशन परिसरातील राजमालती नगर येथे राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मुलगी घरातून गायब झाली. दरम्यान तिच्या आई वडिलांनी परिसर, मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु मुलगी मिळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या आईवडीलांनी दिली. तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.