Home उद्योग भुसावळात भव्य नोकरी उद्योग, व्यवसाय मेळाव्याचे आयोजन

भुसावळात भव्य नोकरी उद्योग, व्यवसाय मेळाव्याचे आयोजन

0
115

bhusawal 1

भुसावळ प्रतिनिधी । समाजातील तरुण बेरोजगारांना औद्योगिक व वाणिज्यिक संस्थांमध्ये रोजगार मिळवण्याकरिता सहाय्य करणे, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी उद्योजकांना आवश्यक सुविधा देणे, स्वयंरोजगाराच्या कौशल्यातून व्यवसाय निर्मिती करणे हे या मेळाव्याचे प्रमुख उद्दिष्ट्य आहे असे समन्वयक व नाशिक येथील उद्योजक राजेश नेहेते यांनी सांगितले. आज ७ एप्रिल २०१९ रोजी येथील महालक्ष्मी मंदिरात लेवा पाटीदार समाजातर्फे दिनांक ५ मे २०१९ रोजी गाडेगाव येथे आयोजित केलेल्या भव्य नोकरी उद्योग, व्यवसाय मेळाव्याच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.

मेळाव्याच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्या त्या भागातील रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होऊन संभाव्य संस्था चालक, मालकांबरोबर थेट मुलाखतीद्वारे रोजगार मिळू शकेल. संस्थाचालक, मालकांनाही योग्य मनुष्यबळ तत्काळ मिळू शकेल. यामध्ये किमान १००० उमेदवारांना तत्काळ रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. समाजातील बेरोजगारी कमी करणे व तरुणाईच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम मेळाव्याच्या माध्यमातून होणार आहे असेही उद्योजक राजेश नेहेते यांनी सांगितले.

बैठकीस यांची होती उपस्थिती
माजी सरपंच प्रल्हाद भारंबे, राजेश नेहेते, दिनेश भंगाळे, अनिकेत पाटील, प्रा.धिरज पाटील, योगेश कोलते, विश्वनाथ वारके, बबलू बऱ्हाटे, प्रकाश वराडे, निलेश वाणी, निता वराडे, डॉ. किशोर भारंबे, निता वराडे, चंद्रकांत जंगले, दिगंबर महाजन, नरेंद्र पाटील, लतेश भारंबे, किशोर पाटील, सुरेश बऱ्हाटे, नितीन फेगडे, रितेश वारके, मनोहर बऱ्हाटे, लीलाधर भारंबे, योगेश पाटील, ध्रुवास महाजन, संजय वारके, पुरुषोत्तम खडसे, किरण पाटील, गोकुळ नेमाडे, महेश भारंबे, चंद्रकांत पाटील, मधुकर लोखंडे, धर्मराज देवकर, शशिकांत फेगडे, बंडू पाटील सह भुसावळ, नेरी, जळगाव, नाशिक, इंदौर, पुणे, मुंबई, सुरत, चितोडा, नशिराबाद, जामनेर, मोताडा, निपाणा येथून समाज बांधव उपस्थित होते. महालक्ष्मी ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.धिरज पाटील यांनी तर आभार योगेश कोलते यांनी मानले.

गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन
या मेळाव्यात प्रमुख उद्योग, कारखाने तसेच माहिती तंत्रज्ञान, संरक्षण, हॉटेल उद्योग, व्यावसायिक आदी क्षेत्रांतील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. संबंधित कंपन्या प्रतिनिधींमार्फत इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेऊन प्रत्यक्षात नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. यासाठी सर्व १० वी, १२ वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण, आयटीआय, अभियांत्रिकी, तसेच पदवी व पदवीधारक तरुणांनी याचा लाभ घ्यावा. या नोकरी मेळाव्यासाठी गरजु उमेदवारांनी आपली माहिती, बायोडाटा ९२७००६५७७५ या क्रमांकावर व्हॉट्सअप करावा. तसेच lewapatidar.businessnetwork2019@gmail.com यावर पाठवावा असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound