भडगाव (प्रतिनिधी) शहरात प्रथमच मोठ्या पाण्याच्या टाकीजवळ ‘लाईफ केअर हॉस्पिटल व जनरल सर्जीकल व ट्रामा सेंटर’चे उदघाटन आज (दि.७) नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा समन्वयक अतुल निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदू सोळंकी तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य रवींद्र भामरे, पंकज शिंदे, डॉ. कुणाल पाटील, डॉ. तुषार पाटील, उदय पाटील, योजनाताई पाटील, प्रमिला माळी, सोंगीराज बाबा महानुभाव दादासाहेब माळी हे उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून माणुसकी धर्म जपावा असे केल्यास काहीही कमी पडणार नाही असे प्रतिपादन अतुल निकम यांनी केले.
प्रा रवींद्र भामरे यांनी गरिबांसाठी पैश्यांअभावी सेवा थांबवू नका, असा सल्ला दिला. विक्रम महाजन यांनी त्यांच्या जीवनातील बिकट प्रसंगाचा आढावा स्वप्न पूर्तीचा आनंद व्यक्त केला. नंदू सोळंकी यांनी अध्यक्षीय भाषणात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारातून सेवा व समर्पण या दोन बाबी या सेंटरमधून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना डॉ. शरद महाजन व डॉ. दीपाली महाजन यांनी गुदद्वार विकार, मूत्रमार्ग विकार स्तनविकार जनरल सर्जरी व न भरून येणाऱ्या जखमांसाठी अत्यल्प दरात सेवा देण्याचा प्रयत्न या हॉस्पिटल मधून केला जाईल, असे यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीनकुमार माळी यांनी केले. स्वागतगीत कुशलकुमार माळी यांनी गायले तर आभार निलिमा माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक महाजन, अभिमान महाजन, शिवदास महाजन, ईश्वर महाजन, शुभम महाजन, सागर महाजन, मयूर माळी आदींनी प्रयत्न केले.