दहिवद येथे उपसरपंचपदी वैशाली माळी यांची बिनविरोध निवड

WhatsApp Image 2019 04 07 at 7.29.58 PM

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे दहिवद येथे आज सरपंच सुषमा वासुदेव देसले यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतीत जनहित परिवर्तन पॅनलच्या ८ जागांसह  बहुमत असल्याने उपसरपंच पदासाठी वैशाली  प्रकाश माळी यांनी नामनिर्देशनपत्र अर्ज दाखल केला होता. आपले गांव आपले पॅनलचे रविंद्र प्रताप माळी यांनी देखिल उपसरपंच पदासाठी नामनिर्देशनपत्र अर्ज दाखल केला होता. निवडणूक प्रक्रियेत रविंद्र प्रताप माळी यांनी स्वतः हून माघार घेतल्याने उपसरपंचपदी वैशाली माळी या एकमेव उमेदवार राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

 

दहिवदच्या इतिहासात ही प्रथमच लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच , पोलिस पाटील व जिल्हा परिषद सदस्य या चारही पदांवर महिला कार्यरत आहेत. यामुळे गावात महिलाराज अवतरल्याने सर्वाना एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे.  महिलाराज हे गावचा सर्वांगीण विकास करतील अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त करण्यात येत आहे.  याप्रसंगी देवानंद कपूरचंद बहारे , सुनिल शालिग्राम पाटील, बाळू आत्माराम पाटील, वर्षा गुलाब पाटील, रेखाबाई राजेंद्र पाटील ,शिवाजी सुकलाल पारधी, योगिता भरतगीर गोसावी,  हिराबाई अशोक धुडकर, आशाबाई मोतीलाल माळी , माणिकराव हिमत गोसावी व मालुबाई सुरेश माळी  हे सदस्य उपस्थित होते. तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ व ग्रामविकास अधिकारी  संजीव सैंदाणे उपस्थित होते.

 

.

 

 

Add Comment

Protected Content