राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटलांचा शिंदे गटात प्रवेश

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  धरणगाव तालुक्यातील निशाणे  येथील रहिवासी ग्रामपंचायत सदस्य व जळगाव जिल्हा राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष शरद पाटील यांनी आज मुंबई येथील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते यांच्या बंगल्यावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

 

 

जिल्हा राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष शरद पाटील यांनी  बाळासाहेबांच्या शिवसेनेत ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांच्या प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार आहे.  शरद पाटील यांच्या प्रवेशाने अनेक युवा कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य महिला मंडळ फार मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या शिवसेना प्रवेश करणार असून धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे.  धरणगाव तालुक्यात जळगाव ग्रामीणमध्ये कापसाचे व्यापारामुळे त्यांचा फार मोठा जनसंपर्क आहे.  याप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष सकल मराठा समाजाचे नेते पी. एम. पाटील सर, तिळवण तेली समाजाचे बाळासाहेब शिवसेनेचे पदाधिकारी हेमंत चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील, जि. प. सदस्य पवन भाऊ सोनवणे, तालुका उपप्रमुख मोती अप्पा पाटील, सोनवदचे ग्रामपंचायत सदस्य बबलू पाटील, आबा महाजन, निलेश पाटील, ना. गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक गोविंद भाऊ पाटील, एकनाथ माळी आदी उपस्थित होते.

 

Protected Content