रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेचा कौलारू घर कोसळल्याने भिंतीखाली दबुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आले आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संगिता विक्रम बारेला वय २५ रा. खरगोन, मध्यप्रदेश ह.मु. विश्राम जिन्सी ता. रावेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
संगिता बारेला ही महिला रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी येथील मनोज पाटील यांच्या शेतातील कौलारू घरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. शनिवारी २ मे रोजी सायंकाळी अचानक वार वादळ सुरू झाले. त्यावेळी संगिता बारेला ह्या महिला घरात जेवन करत होत्या. त्यावेळी वारा वादळामुळे कौलारू घर अचानक कोसळले, त्यामुळे त्यांचा या दुदैवी घटनेत दबुन दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक कल्पेश आमोदकर हे करीत आहे.




