Home क्राईम उचंदा येथील नदीत एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

उचंदा येथील नदीत एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील ४४ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोपान मुरलीधर पवार वय ४४ रा. उचंदा ता. मुक्ताईनगर असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा गावात सोपान पवार हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. गावाजवळ असलेल्या नदी पात्रात त्यांच्या मृतदेह पाण्यात तरंगतांना मिळून आला. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढला. स्थानिक ग्रामस्थांनी मयताची ओळख पटविली. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ राजेश चव्हाण हे करीत आहे.


Protected Content

Play sound