म्हसावद येथील शेतकऱ्याची १ लाख ६७ हजारात ऑनलाईन फसवूणक

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद शेतकऱ्याच्या किसान क्रेडीट कार्डचे काढलेली रक्कम भरण्याच्या नावाखाली १ लाख ६८ हजार ८०९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा  उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेतकरी निंबा दशरथ ठाकरे (वय-६८) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील शेतकरी निंबा ठाकरे हे शेतकरी आहे. शेती करून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. निंबा ठाकरे हे २९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता घरी झोपलेले असतांना त्यांना एका नंबरवरून फोन आला. आपणी किसान क्रेडीट कार्ड मधून बोलत असल्याची बतावणी करून सांगितले की तुम्ही तु अजून पर्यंत किसान क्रेडीट कार्डची रक्कम भरलेली नाही. असे सांगितले. त्यावर ठाकरे यांनी सांगितले की आम्ही रक्कम भरलेली आहे. असे सांगितल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून कार्डचा नंबर मागितला आणि आलेला ओटीपीच्या मदतीने सुमारे १ लाख ६७ हजार ८०९ रूपये ऑनलाईन काढून घेतले. 

दरम्यान दोन दिवसानंतर त्यांनी खात्यातून रक्कम गेल्याचे समजले. निंबा ठाकरे हे गुरूवार २ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसीत धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि रविंद्र गिरासे करीत आहे.

 

Protected Content