आकाशवाणी केंद्राच्या आवारातून २५ हजारांच्या तांब्याच्या तार व प्लेटा लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील आकाशवाणी केंद्राच्या आवारातून  तांब्याच्या तार व प्लेटा असा एकूण २५ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आकाशवाणी केंद्र आहे, या आकाशवाणी केंद्राच्या आवरात कुंपनाच्या भिंतीच्या आत ताब्याचे तार व प्लेटा ठेवलेल्या होत्या, या तांब्याच्या तार व प्लेटा या कुणीतरी चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास समोर आला, सर्वत्र शोध घेतला मात्र संबंधित वस्तूबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही, अखेर याप्रकरणी आकाशवाणी केंद्रातील कर्मचारी महेंद्र चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करत आहेत.

Protected Content