किरकोळ कारणावरून तरूणाला दोघांकडून मारहाण

भुसावळ बाजारपेठ पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाख

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला किरकोळ कारणावरून दोन जणांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. या प्रकरणी शनिवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, क्रिश अनिल संघवाणी (वय-१९) रा. शिवाजीनगर, भुसावळ हा तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार २० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता किरकोळ कारणावरून फरदीन सय्यद साजिद आणि फराज सय्यद साजिद दोन्ही रा. पाटील मळा, भुसावळ यांनी क्रिश संघवाणी याला शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याला जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर शनिवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता क्रिस याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे फरदीन सय्यद साजिद आणि फराज सय्यद साजिद या दोघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content