सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघे अटकेत

पहूर , ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील गोंदेगाव येथे सासरच्या जाचाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज घडली आहे. या प्रकरणी पतीसह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील गोंदेगाव येथील शकील भिकन तडवी याच्याशी जांभोळ, ता. जामनेर येथील रुक्सानाबी हबीब तडवी यांचा मागील वर्षी विवाह झाला होता. विवाहानंतर दोन-तीन महिने सासरच्यांनी रुक्सानाबी हिस चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर सासरच्यांनी तिला माहेराहून ५०,००० रुपये आणण्यासाठी तगादा लावला.आई-वडिलांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे ते ५० हजार रुपये देऊ शकले नाहीत, मात्र आमच्याकडे पैसे आल्यानंतर आम्ही देऊ असे म्हणून त्यांनी आपल्या मुलीस सासरीच राहण्याचे सांगितले होते. अपत्य झाल्यानंतर आपल्या मुलीचा संसार सुखात होईल असा भाबडा आशावाद त्यांचा होता. दरम्यान रुक्सानाबीचा सासरच्यांकडून वेळोवेळी मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच होता.

काल रात्री शनिवारी साडे दहाच्या सुमारास रुकसानाबीने आपल्या आईला पती कडून मारहाण झाल्याची घटना मोबाईलवरून कळवली. आम्ही सकाळी येतो असे सांगून माहेरचे लोक रात्री झोपी गेले. मात्र सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास माहेरच्यांनी फोन केला असता रुकसानाबीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना फोन वरून सांगण्यात आले.

या प्रकरणी मयत रुकसानाबी तडवीच्या आई शकीला आबुदीन तडवी ( रा. जांभोळ ) यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात शकील भिकन तडवी ( पती ), तमीजाबाई भिकन तडवी ( सासू ), जुबेर भिकन तडवी ( जेठ ), परवीनबी जुबेर तडवी ( जेठाणी ) व शरीफ तडवी ( रा . सर्व गोंदगांव )या सासरच्या ५ जणांविरुद्ध भादंवी ३०६ / ४ ४८ ( अ ) ३२३ / ५०४ / ५०६ / ३४अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे करीत आहेत. पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून गोंदेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान ,पतीने बेदम मारहाण करून पत्नीचा खून केल्याचा आरोप रुकसानाबीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. तिने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content