भुसावळच्या गोळीबार प्रकरणात अजून एक आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळी झाडल्याच्या प्रकरणी आज अजून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळी झाडल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ चाळीस वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर नगरसेवक राजकुमार खरातसह अन्य पाच आरोपींना शुक्रवार रात्री शहर पोलिसांनी अटक केली होती. अटकेतील आरोपींना शनिवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत फिर्यादी आदित्य संजय लोखंडे (वय-१९ रा. न्यू आंबेडकर नगर,भुसावळ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार राजकुमार खरात, भूषण सपकाळे, हंसराज, गोलू उर्फ राजन खरात आदींसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी सखोल चौकशी केली असता गोळीबारात राहुल धम्मा सुरवाडे (वय २५, राहणार लाल बिल्डिंग जवळ, भुसावळ) याचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Protected Content