Home Cities जळगाव राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे दरेकारांच्या वक्तव्याचा निषेध (व्हिडिओ)

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे दरेकारांच्या वक्तव्याचा निषेध (व्हिडिओ)

0
35

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षासंदर्भात व महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादी महिला महानगरतर्फे त्यांच्या प्रतिमेमवर शाई फेकत व  जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

 

राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे भारतीय जनता पक्षाचे विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांच्या महिलांचा अपमान करणाऱ्या वक्तव्याचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला. यावेळी  दरेकरांच्या फोटोवर शाई फेकुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले. महिला शहर जिल्हा अध्यक्ष मंगला पटील नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सामिजिक न्याय विभाग प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाट,सामाजिक न्याय विभाग जिल्हा आध्यक्ष कल्पना अहिरे, मिनाक्षी चव्हाण, निरिक्षक शालीनी सोनवणे, कार्याध्यक्ष,अशा येवले, सुमन बनसोडे, दिपीका भामरे, मिनाक्षी शेजवळ, पिनाज फनीफंदा, अॅड.निशा निंबाळकर, निलाक्षी साठे आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/903299740285530

 


Protected Content

Play sound