नायगाव येथील तरुणाने घेतला गळफास

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथील एका अविवाहित तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, आज दिनांक १५ सप्टेंषर बुधवार रोजी नायगाव तालुका यावल येथील राहणारे मिलींद उर्फ भिका गल्लु कोळी (वय२८ वर्ष), ट्रॅक्टर चालक यांने सकाळी ८ वाजेच्या पुर्वी  आपल्या राहत्या घरातील छताच्या साडी बांधुन गळफास घेवुन आपली जिवन यात्रा संपवली असल्याची दुदैवी घटना घडली असुन , मयत भिका कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन , या अविवाहीत तरुणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही. यावल पोलीस स्टेशनमध्ये यांनी याबाबत चंद्रकांत सुखदेव कोळी यांनी खबर अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.

 

Protected Content