Home Cities जळगाव नशिराबाद येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

नशिराबाद येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

0
142

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील भवानीनगर येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन बळीराम खारोटे (वय-३०) रा. भवानी नगर, नशिराबाद ता.जि. जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘नशिराबादमधील भवानी नगरात चेतन खारोटे या तरुणाने राहत्या घरात सोमवारी गळफास घेवून आत्महत्या केली. प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मयत घोषित केले.

आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. याप्रकरणी नशीराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गजानन देशमुख हे करीत आहेत.


Protected Content

Play sound