दोन वर्षांच्या कालखंडानंतर रमजान ईदची सामुहिक नमाज उत्साहात

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून पवित्र ईदची सामूहिक नमाज अदा करण्यावर बंधने होती. मात्र यंदा कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव ओसरल्याने प्रशासनाकडून नियमात सूट देण्यात आल्याने मंगळवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शहरातील पिंपरुड रस्त्यावरील इदगाह मैदानावर सकाळी ८ वाजता नमाज पठण करण्यात आले.

शहरातील पिंपरुड रस्त्यावर आठवडे बाजारा जवळील इदगाह मैदानावर तर काही मुस्लिम बांधवांनी आपल्या प्रार्थना स्थळात सामूहिकरित्या नमाज अदा केली. गेल्या दोन वर्षानंतर शहरात प्रथमच पवित्र रमजान ईदची नमाज सामूहिकरीत्या पठण करण्यात आली.

याप्रसंगी सावदा पोलीस ठाण्याचे सपोनि देविदास इंगोले, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, बाजार समिती संचालक पंकज येवले, सैय्यद अझहर सैय्यद तुकडू, मुराद तडवी, यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Protected Content