एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त घोषवाक्य स्पर्धा उत्साहात

मुक्ताईनगर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर व संवेदना फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ ते २७ ऑगस्ट दरम्यान राज्यस्तरीय ‘घोषवाक्य स्पर्धा-2021’ आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेत मा.एकनाथराव खडसे: सामान्य व्यक्ती ते असामान्य नेता” या विषयावर राज्यभरातून 147 स्पर्धकांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदविला. या स्पर्धेत विकास जाधव (बारामती), रामेश्वरी धामोळे (बोदवड) व आशिष टोंगळकर (जळगाव जामोद) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या हस्ते बक्षीस म्हणून अनुक्रमे 3000 रुपये,2000 रुपये,1000 रुपये व प्रमाणपत्र दि.3 सप्टेंबर 2021 रोजी वितरित करण्यात आले.

सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी अॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर (अध्यक्ष,संवेदना फाउंडेशन, जळगाव) व प्रा.डॉ.एच.ए.महाजन (प्र.प्राचार्य श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.पी.पाटील, प्रा. डॉ.डी.एन.बावस्कर, प्रा.डॉ.एस.के.थोरात,प्रा. एल.एल.भंगाळे, प्रा.डॉ.ए.सी.बढे प्रा.डॉ.व्ही.बी.डांगे यांनी अथक परिश्रम घेतले. तर सदर स्पर्धेचे परीक्षण समाधान गायकवाड (जे.ई.स्कूल, मुक्ताईनगर), प्रा.डॉ.जी.एस.चव्हाण व प्रा. डॉ.के.एन.गायकवाड(खडसे महाविद्यालय) यांनी केले.

 

Protected Content