६ राज्यांना ४ हजार ३८१ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । केंद्र सरकारने ६ राज्यांना ४ हजार ३८१ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. बंगाल, ओडिशा, महाराष्ट्रासह ६ राज्यांना ही मदत नैसर्गिक नुकसानासाठी देण्यात येत आहे. निसर्ग तुफानामुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्राला २६८.५९ कोटी रुपये मंजूर आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांच्या समितीने ही अतिरिक्त मदत मंजूर केली. पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्रासारख्या राज्यांना अम्फानस निसर्ग यांसारख्या वादळांनी तडाखा दिला. कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांना पुराचा सामना करावा लागला. सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. गृह मंत्रालयाद्वारे ही मदत नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फंडांतर्गत मंजूर करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालसाठी २७०७.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या राज्यात अफान तुफानामुळे मोठे नुकसान झाले होते. ओडिशाला १२८.२३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे नुकसान झालेल्या राज्यांनाही मदत देण्यात आली आहे. यात कर्नाटकला ५७७.८४ कोटी रुपये, मध्य प्रदेशला ६११.६१ कोटी रुपये तर, सिक्किमला ८७,८४ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

याच वर्षी मे महिन्यात अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशात हाहाकार माजला होता. समितीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली होती. वित्तीय वर्ष २०२०-२१ मध्ये २८ राज्यांना SDRF फंडातून आतापर्यंत १५५२४.४३ कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे.

Protected Content