अमेरिका-चीन व्यापार तोडग्याचा शक्यतेने शेअर बाजारामध्ये तेजी

share market

 

मुंबई प्रतिनिधी । मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षावर तोडगा निघण्याच्या शक्यतेने अमेरिका आणि आशियातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ४२३ अंकांची झेप घेत पुन्हा एकदा ४१ हजार अंकांची पातळी ओलांडली.

गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्स आणि निफ्टीने सुस्साट दौड घेतली आहे. आज (दि.१३ शुक्रवारी) ४२३ अंकांची झेप घेत सेन्सेक्सने तीन आठवड्यानंतर पुन्हा एकदा ४१ हजार अंकांची पातळी ओलांडली. सध्या तो ४१ हजार ५ अंकांवर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०८ अंकांच्या वाढीसह १२ हजार ८०अंकांवर व्यवहार करत आहे. यापूर्वी सेन्सेक्स २७ नोव्हेंबर रोजी ४१ हजार अंकांवर बंद झाला होता. आशियातील बहुतांश बाजारांमध्ये तेजी आहे. ज्यात जपानच्या निक्केई निर्देशांकात दोन टक्क्याची वाढ झाली आहे. सिंगापूरमधील शेअर बाजार ३२ अंकांच्या वाढीसह खुला झाला.

Protected Content