कॉंग्रेस नेत्याने केली आपल्याच नेत्याला हटविण्याची मागणी !

नागपूर प्रतिनिधी | कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह आज पुन्हा उफाळून आला असून माजी आमदार आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्याच पक्षाचे मंत्री सुनील केदार यांच्यावर २१० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून त्यांना मंत्रीमंडळातून हटविण्याची मागणी केली आहे.

गपूर जिल्हाबँक घोटाळाप्रकरणी कॉंग्रेसनेते माजी आमदार अशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहीत पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हाबँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाला आणि जनसामान्यांचे, शेतकर्‍यांच्या १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार तेव्हा झाला होता. आज १९,२० वर्ष झाल्यानंतर ही न्यायालयीन प्रक्रीया अंतिम टप्यावर आली आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने नवीन वकील आसिफ कुरेशी यांची नियुक्ती त्या ठीकाणी केली. कुरेशी हे महाराष्ट कॉंग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष आहेत. सुनील केदार हे कॉंग्रेसचे आमदार आणि मंत्री आहेत. म्हणून या सर्व प्रकारावर पडदा पडेल का?, अशी जनसामान्यांची भावना मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आसिफ कुरेशी यांची नियुक्ती रद्द करून त्यांच्या जागी उज्वल निकम सारख्या एखाद्या सक्षम सरकारी वकीलाची नियुक्ती करावी, अशी मागणी अशिष देशमुख यांनी केली आहे.

या पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, १५० जरी नागपूर जिल्हा बँकेचे असले तरी वर्धा, उस्मानाबाद सहकारी बँकेचे मिळून २१० कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा परिस्थितीत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कोर्टात खटला सुरु आहे. त्या व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवण हे काही सरकारला शोभत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले सुनील केदार यांना बडतर्फ करावे, अशी मागणी देखाल अशिष देशमुख यांनी केली आहे.

Protected Content