सावधान : कोरोनानंतर चीनमध्ये उंदरांपासून होणाऱ्या हंता व्हायरसने वाढवली चिंता

बिजिंग (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसपासून सुटका होत नाही, तोच चीनमध्ये उंदरांपासून होणाऱ्या हंता व्हायरसने एकाचा मृत्यू झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये तब्बल हजारो जणांचे बळी गेले आहेत. मात्र, नंतर इटलीने चीनला मागे टाकले. गेल्या आठवड्यापासून वुहानमध्ये नव्या रुग्णांची संख्या कमी झाली होती. तर उपचार घेऊनही हजारो रुग्ण घरी देखील परत गेले होते. मात्र, आता उंदरांपासून होणाऱ्या हंता व्हायरसमुळे चीनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाने थैमान घातलेल्या युन्नान प्रांतामध्येच एका व्यक्तीचा सोमवारी हंता या नव्या व्हायरसमुळे मृत्यू झाला. हा व्यक्ती शाडोंग प्रांतातून रोजगारासाठी बसने येत होता. यामुळे त्यांच्यासोबत बसमध्ये प्रवास करत असलेल्या ३२ लोकांचीही तपासणी करण्यात आली आहे. हा व्हायरस उंदीर किंवा खारच्या संपर्कात आल्यास होतो. उंदरांनी घरात आतबाहेर केल्यास हा व्हायरस पसरतो. जर कोणी निरोगी असेल आणि तो जर हंता व्हायरसच्या संपर्कात आला तर त्याला लागण होते. हंता व्हायरस जीवघेणा असून ताप, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलटी, डायरिया आदी लक्षणे दिसून येतात. याची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ३८ टक्क्यांनी वाढते. दरम्यान, आता जर चीनी लोकांनी प्राण्यांना खाणे सोडले नाही तर, कोरोनापेक्षा मोठी महामारी पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Protected Content