नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई : सपोनि रविंद्र जाधवांचा इशारा

कासोदा ता. एरंडोल, प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी कायदा कलम १४४ नियम लागू करण्यात आला आहे . त्याअनुषंगाने आज दि. २४ रोजी प्रांताधिकारी एरंडोल यांच्या आदेशांने कासोदा पोलिस स्टेशनचे सपोनि रविंद्र जाधव यांनी ग्रामस्थांना , तसेच किराणा दुकानदार अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना आदेशपत्रका प्रमाणे वेळापत्रक ठरवून दिले आहे.

संचारबंदी कायदा कलम १४४ नियम लागू करण्यात आल्याने किराणा दुकान वेळ सकाळी ९ ते दुपारी १ वा. पर्यत, दूध केंद्र सकाळी ८ ते १० व संध्याकाळी ५ ते ७ वाजेपर्यत, मेडिकल सकाळी ९ ते १ व संध्याकाळी ५ ते ८ वाजेपर्यत सुरु ठेवता येणार आहे. भाजीपाला दुकाने सकाळी ८ ते दुपारी १२ वाजे पर्यत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच गरजेपुरते हातगाडीवर विक्री करू शकतात. अत्यावश्यक गरजेशिवाय बाहेर पडू नका सहकार्य करा. संचारबंदीतील नियम काटेकोरपणाने पालन करावे , ५पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊ नये , अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सपोनि रविंद्र जाधवांनी दिला इशारा दिला आहे. तसेच ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने देखील ग्रामस्थांना विनाकारण बाहेर पडू नका. आपली व आपल्या मूला बाळांची काळजी घ्या व डॉक्टर्स , पोलीस व प्रशासन आणि शासन यांना मदत करा असे आवाहन करण्यात येत आहे.

Protected Content