जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदवावे – जिल्हाधिकारी

जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या आदेशान्वये जळगाव जिल्ह्यात छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केला आहे.13 व 14 आणि 27 व 28 नोव्हेंबर रोजी विशेष मोहीमेचे आयोजन केले असून जळगाव जिल्ह्यातील तरूणांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते.  यात १ नोव्हेंबर रोजी प्रारूप याद्या प्रसिध्द केले जाणार आहे. त्यानंतर १ नोव्हेबरते ३० नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येतील, १३, १४ २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. आणि ५ जानेवारी २०२२ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी केली जाणार आहे.  जिल्ह्यातील रहिवाश्यांनी 1 नोंव्हेबर, 2021 ते दि. 30 नोव्हेंबर, 2021 या कालावधीमध्ये  योग्य तो फॉर्म – नमुना अर्ज भरून प्रशासनाकडे जमा करावे.

1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित नव्यांने नाव नोंदणी करण्याचे शिल्लक असल्यास अशा नवतरुण मतदारांना भारत निवडणूक आयोग यांनी पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे अशा मतदारांनी तसेच इतर काही मतदार आहेत ज्यांची नावातील दुरुस्ती करणे, कायमस्वरुपी स्थानात बदल करणे, मयत मतदार यांचे नावे कमी करणे असे अर्ज संबंधित तहसिलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सादर करता येणार आहे. मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

Protected Content