Home क्राईम जळगावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

जळगावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

0
103

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अवारात एका ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आज गुरूवारी २८ ऑक्टोबर रोजी साकाळी ११ वाजेच्या सुमारास ६५ वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान तिच्याजवळ ओळख पटविण्यासंदर्भात कोणतीही वस्तू मिळाली नाही. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पवार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अतुल पाटील, पोकॉ. किरण पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound