भरधाव वाळू ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यार्थी जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चंदुअण्णानगर चौफुलीजवळील महादेव किराणा दुकानासमोर भरधाव येणाऱ्या वाळू ट्रॅक्टर चालकाने विद्यार्थ्यांला जोरदार धडक दिली. या अपघात विद्यार्थी किरकोळ जखमी झाला असून सायकलचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवारी सकाळी घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चंदुअण्णा नगरातील दर्शन परशुराम पाटील हा आठवीच्या वर्गात प्रोग्रसिव्ह इंग्लीम मीिडयम स्कूलमध्ये आहे. पेपर सुरू असल्याने तो सकाळी अकरा वाजेच्या सुमारस घरातून निघाला. चंदुअण्णानगर कमानि बाहेर पडल्यानंतर महादेव किरणा दुकानाजवळ मागून येणाऱ्या भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात तो सायकलवरून खाली पडला. तर मुजोर ट्रॅक्टर चालकाने सायकलवरून ट्रॅक्टर चालवित पळ काढला. या अपघातात दर्शन पाटील हा किरकोळ जखमी झाला आहे. काही नागरिकांनी आरडाओरड करूनही ट्रॅक्टर चालकाने न थांबता सुसाट पळ काढला.

चंदुअण्णानगर परिसरात वाळून भरलेली वाहने नेहमीच सुसाट धावतात. अनेकदा अपघात होवून अनेकांचा बळी गेला आहे. जवळच असलेल्या गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक दिवस रात्र सुरू राहते. कारवाई होवू नये या भीतीने नेहमीच वाळूची वाहने सुसाट चालतात. याबाबत अनेकदा तक्रार करूनही ठोस कारवाई केली जात नाही. संबंधित विभागांशी लागेबांधे असल्याने चिरीमिरी चालते. यामुळे की काय या ठिकाणी कारवाई होताना दिसत नाही.

मॉिर्नंग वॉकमूळे रस्त्यावर वर्दळ
निमखेडीपासून ते थेट एसएमआयटी कॉलेज परिसरातील सर्व नगर कॉलन्यातील रहिवासी सकाळी व सायंकाळी जुन्या हायवेअर मॉिर्नंग वॉकसाठी येतात. नेहमीच या रस्त्यावर वर्दळ असते तर चोरटी वाळूची वाहतूकही या रस्त्यावरून होत असल्याने अपघातचे प्रमाणही वाढले आहे. तसेच शहरातील कचराही या पोलिस कॉलनीच्या पुढे फॅक्टरीत आणला जातो. यामुळे कचऱ्यांचे ट्रॅक्टर व डंपर चालतात.

वाळू वाहतुकीचा प्रवास असा
निमखेडीच्या खाली वाळू भरल्यानंतर थेट निमखेडी गावातून वाळूची वाहने जुन्या महामार्गावर येतात. तसेच गिरणा नदीच्या पुलावरून ही वाहने आहूजा मार्गे जुन्या महामार्गाकडे वळतात. तर रेल्वे पुलाखालून वाळू भरल्यानंतर रेल्वच्या बोगद्यातून पोलिस कॉलनीकडून महामार्गावर येतात. या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईची मागणी होत आहे.

Protected Content