Home Uncategorized नुतन मराठाच्या प्राचार्यांवर कारवाईची मागणी

नुतन मराठाच्या प्राचार्यांवर कारवाईची मागणी

0
105


जळगाव प्रतिनिधी । नूतन मराठा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे व बँकेचे अधिकृत चलन न करता टि.सी. दिले जाते, आणि माझ्यावर खोटे-नाटे बेछूट आरोप करीत असल्याने नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी.देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची अशी मागणी पियुष पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन विद्यापीठ कुलगूरू, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल.पी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे व बँकेचे अधिकृत चलन न भरता तडजोड करून टी.सी. दिले आहेत. याचा पाठपुरावा मी करत असल्याने देशमुख यांनी माझ्याविरुद्ध खोटे-नाटे बेछूट आरोप करीत माझी बदनामी चालवली आहे. त्यांच्याविरुद्ध मी लवकरच मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती यापुर्वी 12 जुलै रोजी पियूष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले होते की, प्राचार्य देशमुख यांनी संस्थेच्या वरणगांव येथील कॉलेजमध्ये त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती असताना संगणक व स्टेशनरी खरीदी प्रकारणात कोट्यावधींची बनावट बिले सादर करून त्यात अपहार केलेला आहे. याबाबत त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचा गुन्हा दाखल असून, त्याची चौकशी सुरु आहे. नूतन मराठा महाविद्यालयाचा यु.आर. म्हणून माझी बिनविरोध निवड झाल्यावर प्राचार्य देशमुख यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला होता. तो सर्व विद्यार्ध्यांना घेऊन चालणारा विद्यार्थी असून त्याचे काम सर्वांना आवडणारे आहे, असे मत व्यक्त केले होते.


Protected Content

Play sound