Home Cities जळगाव महापालिका उपायुक्त खोसे व कहार यांची बदली

महापालिका उपायुक्त खोसे व कहार यांची बदली

0
150

जळगाव प्रतिनिधी । महानगरपालिकेतील उपायुक्त चंद्रकांत खोसे यांची पुणे येथे तर सहायक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांची भिवंडीला बदली करण्यात आली आहे.

उपायुक्त खोसे हे १ जुलै २०१७ पासून उपायुक्त पदावर कार्यरत होते. त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कहार यांना भिंवडी महापालिकेत सहायक आयुक्तपदी जबाबदारी देण्यात आली आहे. उपायुक्त खोसे यांच्या रिक्त जागी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकारी उत्कर्ष गुट्टे तर उपायुक्त कहार यांच्या रिक्त जागेवर हिंगणघाट येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनानाथ दंडवते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.


Protected Content

Play sound