मार्च २०२१ पर्यंत कोरोना लस दृष्टीपथात

न्यूयॉर्क वृत्तसंस्था । भारतात करोनाला अटकाव करणारी लस २०२१ च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होणार आहे. लशीला सर्व प्रकारच्या मंजुरी मिळेपर्यंत २०२१ उजाडणार आहे. सरकारला लशीच्या एका डोससाठी अंदाजे २२५ रुपये द्यावे लागणार आहे. , नागरिकांना किमान साडेचारशे रुपय्यांना ही लशीचा डोस उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

सिरमशिवाय भारतात आणखी तीन कंपन्या लस विकसित करत आहे. जाइडस, भारत बायोटिक आणि बायोलॉजिकल ई या त्या कंपन्यां आहे. या कंपन्यांच्या लशी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात आहे. जागतिक पातळीवर सध्या चार लशींना २०२० या वर्षाखेरीस आणि २०२१ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यापर्यंत मंजुरी मिळू शकते. भागिदारीच्या माध्यमातून भारताकडे दोन लस आहेत.

ऑक्सफर्डची वायरल वेक्टर वॅक्सीन आणि नोवावॅक्सची प्रोटीन सब युनिट वॅक्सीनचा पर्याय आहे. भारताला लस उत्पादन करण्याबाबतच्या आव्हानांचा सामना करावा लागणार नसेल . लस चाचणीचे टप्पे आणि त्यानंतर आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्यानंतर लशीला सामान्य नागरिकांच्या वापरासाठी मंजुरी दिली जाते.

सिरम इन्स्टिट्यूट २०२१ मध्ये ६० कोटी डोस आणि २०२२ मध्ये १०० कोटी डोसचा पुरवठा करू शकतो. गावी द वॅक्सीन अलायन्स आणि निम्म व मध्यम उत्पन्नन गटातील देशांना पुरवठा करण्याच्या वचनानुसार, भारतात वर्ष २०१ मध्ये ४० ते ५० कोटी डोस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. शासकीय आणि खासगी लशीचे बाजारातील प्रमाण ५५:४५ इतके होणार असल्याचा अंदाज आहे.

Protected Content