उपायुक्तांकडून अतिक्रमण विभागाचा पदभार काढून घ्या ; शिवसेनेची मागणी (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील दुकानदार व हॉकर्स फेरीवाले विक्रेते यांना व्यवसाय करतांना मनपाचे उपायुक्त आडकाठी आणत असून त्यांच्याकडून अतिक्रण विभागाचा पदभार काढून घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली.

गेल्या मार्च महिन्यापासून आजतागायत लॉकडाऊन मुळे अनेक कंपन्याचे काम बंद आहे, रिक्षा, दुकाने, फेरीवाले, बांधकाम मजुर, ही सर्व कामे बंद असल्यामुळे अनेक तरुणांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यात जे काही तरुण आपला चारीरार्थ चालविण्यासाठी दुकाने व फिरता व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर मनपातर्फे कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी शिवसेना माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे यांनी केला आहे. अशा मनपा अधिकाऱ्यांना समज देण्यात यावी अन्यथा त्यांचा पदभार काढून घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, राहुल नेतलेकर, मंगला बारी, सागर कुटुंबके, चेतन प्रभूदेसाई, लोकेश पाटील, नीलू इंगळे, विजय चौधरी, विजय राठोड, भैय्या वाघ, विलास बारी, रोहन परासे, हितेश शहा, राजेंद्र पाटील, बापू मेने, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/611220722805465/

Protected Content