मनपाच्या ‘सम-विषम’ नियमांचा दुकानदारांकडून उडाला फज्जा…!

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील बाजारपेठा कंटेनमेंट झोन वगळता नियमांच्या अधीन सुरू राहण्याचे आदेश दिले होते. सकाळी नऊ वाजेपासून जळगावातील दुकाने सुरू झाली. दुकानांसाठी सम व विषम हा नियम आयुक्तांनी लागू केलेला आहे. मात्र आज अनलॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पुर्ण: फज्जा उडाला. “मिशन बिगन अगेन”चा नागरिकांनी नियम तोडत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दृष्य आज दिसून आले.

या अंतर्गत रस्त्यांच्या एका सम तारखेला तर दुसऱ्या दिवशी विषम तारखेस दुसऱ्या बाजूची दुकाने सुरू राहतील असे महापालिकेचे आयुक्त सतिष कुळकर्णी यांनी आदेश काढले होते. मात्र दुकानदारांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अपेक्षित होते. मात्र जळगावात दुकानदारांनी पालिकेचे नियमांचे उल्लंघन करून नियम ढाब्यावर बसवून आपल्या मर्जीप्रमाणे सर्रासपणे दोन्हीकडची दुकाने सुरू ठेवली. महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेश पुर्णत: धुडकावून लावले आहे. परिणामी शहरातील प्रमुख रस्त्यावर नागरिकांची विविध खरेदी साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. सम व विषम या नियमाचे पालन केले गेले नाही. याचा नियमाचा फज्जा उडाला. मनपा उद्या याबाबत उद्या काही निर्णय घेते का याकडे लक्ष लागून आहे.

Protected Content