कृषिपंपांना ८ तास अखंडितपणे वीजपुरवठा सुरळीत करा; भाजपचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कृषिपंपांना ८ तास अखंडीतपणे वीजपुरवठा तीन दिवसात सुरळीत करावा, अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा करेल, असा इशारा भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी दिला.

 

खासदार उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना  निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या नियमानुासर कृषिपंपांना किमान ८ तास वीज देण्याचे धोरण असताना माञ कुठे ४ तास तर कुठे २ तास अखंडित वीजपुरवठा देण्यात येत आहे. सद्यस्थितीत ४५ ते ४६ अंश सेल्सियस तापमान असल्याने या कडकडीत उन्हात केळी बागासह रब्बी मधील मका पिकांसह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता असताना वीज नसल्याने शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचा संयम संपला आहे. कानळदा आणि भादली सबस्टेशन परिसरात तर अवघा २ तास देखील वीजपुरवठा दिला जात नसल्याने प्रचंड रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तातडीने वीज मंडळांच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन किमान कृषिपंपांना ८ तास अखंडितपणे वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आदेशित करावे अन्यथा वीज वितरण कंपनी विरुद्ध शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

 

याप्रसंगी भाजपा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पाचोरा तालुका अमोल शिंदे, भाजपा प्रदेश प्रतिनिधी ॲड. विहार पाटील, गोपाळ भंगाळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, माजी जि.प. सदस्य अंदुरे, संदीप पाटील, अरुण सपकाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content